Friday, 30 June 2017

झणझणीत मालवणी चिकन





झणझणीत मालवणी चिकन(3 जणांसाठी)

1/2 कि चिकन स्वच्छ धुवून त्याला 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट,1/2 टीस्पून हळद लावून ठेवावे. 4 कांदे स्लाईस करून घ्यावे,10 लसूण पाकळ्या,1/2 वाटी प्रत्येकी कोरडे व ओले खोबरे.आधी कोरडे खोबरे भाजून बाजूस ठेवावे,त्यानंतर लसूण,कांदा आणि ओले खोबरे लाल रंगावर भाजून घ्यावे, हे सर्व थोडे पाणी घालून बारीक वाटावे. पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यावे,गरम तेलावर 3/4तमाल पत्रे टाकून त्यावर 2 बारीक चिरलेले कांदे,घालून लाल होईपर्यंत परतावे.त्यावर 1/4 चमचा हळद,1 2 चमचे लाल तिखट,1 चमचा गरम मसाला,2 चमचे मालवणी मसाला,बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तेल सुटेपर्यंत परतावे, त्यावर चिकन घालून पुन्हा परतावे.कांदा खोबऱ्याचे वाटण घालून थोडे पाणी घालून तेल सुटे पर्यंत परतावे. हवे तेवढेच पाणी घालून,मध्यम आचेवर चिकन शिजवावे.चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी आणावी आणि तांदळाच्या किंवा आवडत्या भाकरी बरोबर,कांदा कोथिंबीरीसह सर्व्ह करावे.