शाही अंगुरी रसमलाई(15 जणांसाठी)
म्हैसदूध 5 लि. रबडीसाठी
गायीचे दूध 2 लि. अंगुरीसाठी(सुट्टे, नॉन पाश्चराईज्ड)
अंगूर आदल्या दिवशी करून फ्रिजमध्ये ठेवावी.चांगली मुरते.
अंगुरी बनविण्यासाठी प्रथम गायीचे दूध उकळी येईपर्यंत गरम करावे,गॅस बारीक करावा,3 चमचे व्हिनेगरमध्ये तेवढेच पाणी घालून ते दुधामध्ये सावकाश टाकत दूध पूर्णपणे फाडावे.दुसऱ्या पातेल्यावर मसलीन क्लॉथ पसरून त्यावर फाडलेले दूध ओतून पनीर वेगळे करावे,त्यातील सर्व पाणी हळुवारपणे पिळून(त्यापूर्वी त्यावर थंड पाणी ओतावे) काढावे,फार कोरडे करू नये.
एका मोठ्या ताटात हे पनीर घेऊन हाताने छान मळावे.ते ताटापासून सुटे होईपर्यंत मळावे.त्यानंतर त्याचे छोटे गोळे करावे.उकळल्यावर ते जवळपास दुप्पट आकाराचे होतात,त्या अंदाजाने करावे.कुकरमधे 1 वाटी साखर 6 वाट्या पाणी घेऊन उकळी आणावी,त्यामध्ये लहान गोळे फुगून मोठे होतील एवढी जागा ठेवून,पनीरचे बॉल्स सोडावे व त्यावर झाकण ठेवावे,पूर्ण बंद नाही केले तरी चालते.6/7 मिनिटातच ते बॉल्स मोठे होऊन पाकवर तरंगतात.यासाठी गॅस मोठाच ठेवावा.अंगुरी थंड होऊ द्यावी.थंड झाल्यावर फ्रिजमधे ठेवून द्यावी.
रबडीसाठी दूध आटवावे(5 लि चे 3 लि) त्यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालावी, दूध थंड झाल्यावर त्यामध्ये जायफळ,वेलची,केशर आणि ब्लांच केलेले बदाम स्लाईस करून घालावे.रबडी गरम असतानाच,अंगुरीमधील रस हलक्या हाताने दाबून काढावा आणि ते रबडीमध्ये सोडावे.रबडी गार झाली म्हणजे फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवावी.पाहिजे तेव्हा बाहेर काढून सर्व्ह करावी.

No comments:
Post a Comment