Saturday, 25 February 2017

Upawasachi Idli Chatney


Mahashivratri special,an experiment which turned out fantastic and beyond expectations.
INSTANT UPWAS IDLI WITH GREEN CHATNEY.

Recipe
3 parts bhagar,1 part sago soaked for 2 hrs.Remove all water from it and grind to thick paste.Rest for another 2 hrs.Add  1 teaspon fruit salt with 1 teaspoon of lime juice and salt to taste.Mix well.Add the batter in preheated idli cooker,cook for 10 to 12 min.(Before adding the batter,greece idli plates with ghee.)
Remove nice and fluffy idlis,serve with green chatney.

Friday, 24 February 2017

उपवासाचे भाजणीचे थालीपीठ


पुन्हा एकदा उपवास स्पेशल भाजणीचे थालीपीठ.
भाजणी घरीच केलेली.साबुदाणा,वरई आणि राजगिरा सम प्रमाणात घेऊन भाजून घेतला,थंड  झाल्यावर ड्राय ग्राइंडरमध्ये दळून घेतली.
थालीपीठ रेसिपी
2 लहान वाट्या भाजणी,2 टेबलस्पून शेंगदाणाकूट,2 मध्यम आकाराचे उकडून किसलेले बटाटे,2 टेबलस्पून दही,2 मिरच्या बारीक चिरून,1/2 इंच आले किसून,1/2टीस्पून जिरेपावडर,कोथिंबीर बारीक चिरून,2टेबलस्पून तूप,आवश्यकतेनुसार पाणी,चवीप्रमाणे मीठ,थोडी साखर,
हे सर्व एकत्र करून 1/2 तास  भिजवून ठेवावे.थालीपीठ थापून,तूप सोडून खरपूस भाजावे,दही आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
(यात दही,तूप आणि उकडलेला बटाटा आवश्यकच,त्यामुळेच ते आरवार आणि खुसखुशीत होते)

Thursday, 23 February 2017

कवठाची जेली

महाशिवरात्र स्पेशल,कवठाची जेली

कवठ फोडून आतील गर काढावा,गर बुडेल इतके पाणी त्यामध्ये घालावे,1/2तासानी त्याचा सर्व गर काढावा,आणि तारेच्या चाळणीने गाळुन घ्यावा.जितका गर असेल तितकी किंवा थोडी कमी साखर त्यामध्ये घालुन उकळू द्यावे,मिश्रण सारखे ढवळत रहावे,थोड्या वेळाने ते घट्ट होऊ लागते,त्याचा फेस कमी होऊन चांगली चमक आली म्हणजे ते तयार झाले असे समजावे,डब्यात काढून थंड झाल्यावर वड्या पाडाव्या. तयार वड्या फ्रिजमधे बरेच दिवस राहू शकतात.कवठाच्या गरात नैसर्गिक पेक्टीन असते त्यामुळे जेली घट्ट होते व टिकते.

मिक्स व्हेज कोरमा

मिक्स व्हेज कोरमा

फ्लॉवर,मटार,बटाटा,गाजर,घेवडा सर्व मिळून 2 वाट्या मध्यम आकाराचे चिरून उकळून घ्यावे,पाणी काढून टाकावे.
1 मध्यम आकाराचा कांदा,1 टोमॅटो,आलंलसूण पेस्ट 1/2 टीस्पून,1/2 टीस्पून प्रत्येकी धने पावडर,जिरे पावडर,हळद,1 टीस्पून लाल तिखट,काजू तुकडा,1/2 टीस्पून खसखस,5/6 मिरे2/3 लवंग,2/3 हिरवी वेलची,लहान तुकडा दालचिनी आणि फुलचक्रीे हे सर्व बारीक वाटून घ्यावे.
2 टेबलस्पून तेल गरम करून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतावा,काजू असल्यामुळे कढईत खाली करपू देऊ नये,उकळलेल्या भाज्या घालाव्या,थोडे पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालावे,चिमूटभर साखर घालावी,मंद आचेवर तेल वर येईपर्यंत ठेवावे,कोथिंबीर घालून पराठा किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावा.

Sunday, 19 February 2017

Paneer Butter masala

Paneer-Butter Masala

2 med size onions finely chopped,ginger garlic paste 1 teaspoon,tomato puree(4 tomatoes)paneer 200 gms,
Hit 2 tablespoons of oil and 1 tablespoon of butter,add 4 green cardamos,3 cloves,small piece of cinaman,soute for a minute,add chopped onion,soute till it becomes translucent,add ginger garlic paste and soute for 2 mins.add tomato puree and soute for another 2 mins.add 1/4 teaspoon of turmeric,1 and 1/2 teaspoon red chilli powder,1 teaspoon garam masala,1/2 teaspoon cummin powder,1 teaspoon corriender powder,soute till oil seperates,add 2 teaspoons cashew paste, two spoons fresh cream and soute,1 teaspoon kasoori methi powder,salt and sugar to taste.put this now on low flame,add paneer,and stirrfried capsicum sqares,garnish with butter.

Chicken Dum Biryani


My favourite CHICKEN DUM BIRYANI.
It was really mouth watering...
Recipe.....
Fresh chicken 1/2 kg.
Marinate with 200 gms curd,2 teaspoons ginger garlic paste 1 teaspoon each of corriender powder & cummin powder,2 teaspoons red chilli powder,1/2 teaspoon turmeric, 2 teaspoon Everest Biryani masala,1/2 lime,finely chopped corriender and mint leaves,2 table spoons oil,salt to taste.Apply the merinade to chicken gently and store it in refrigirator for 4 hrs.
Take 1/2 kg basmati rice,soak it for an hr.Take two ltrs of water,boil it,add tezpatta,shahi jira,green cardamom,black pepper,cloves,ss per taste.Add soaked rice and cook up to 70% .
While rice is cooking place marinated chicken at the bottom of the cooker,add some water,add fried onion. Remove par cooked rice with strainer and add it over the chicken,add safron mixed milk,ghee and fried onion,out the lid and cook biryani on medium heat initialy for 10 min, and on low flame for another 10 min.
After 3/4 whistels,remove cooker from flame.
Serve hot with cuchumber and garnish with finely chopped corriender and fried onion.

Saturday, 18 February 2017

थालीपीठ


आपलं थालीपीठ हा प्रकार हॉटेलात खाण्याचा नाहीच,कारण तिथे पीठ भिजवतात आणि लगेचच करतात त्यामुळे ते कडक होते.घरी करताना त्यात पुरेसा कांदा,कोथिंबीर,टोमॅटो,असल्यास साधं वरण, थोडं दही, तिखट,मीठ,ओवा,एखादी मिरची बारीक स्लाईसेस,थोडं आलं किसून,आणि तेल,हे सर्व भाजणीत मिक्स करून गोळा भिजवावा,आवश्यकता असेल तरच पाणी घालावे,कारण त्यात सर्व ओले पदार्थ असतात,15/20 मिनिटे थांबून मग हात ओलसर करून थालीपीठ लावावे,मध्यम आचेवर झाकण ठेऊन करावं,झाकण ठेवण्यापूर्वी थालिपीठास 4/5 ठिकाणी खड्डे करून तेल घालावे.खुसखुशीत होते.दही किंवा लोणी बरोबर द्यावे.हे ingrediants घेऊन ज्वारीच्या पिठाची सुद्धा छान थालिपीठे होतात.