पुन्हा एकदा उपवास स्पेशल भाजणीचे थालीपीठ.
भाजणी घरीच केलेली.साबुदाणा,वरई आणि राजगिरा सम प्रमाणात घेऊन भाजून घेतला,थंड झाल्यावर ड्राय ग्राइंडरमध्ये दळून घेतली.
थालीपीठ रेसिपी
2 लहान वाट्या भाजणी,2 टेबलस्पून शेंगदाणाकूट,2 मध्यम आकाराचे उकडून किसलेले बटाटे,2 टेबलस्पून दही,2 मिरच्या बारीक चिरून,1/2 इंच आले किसून,1/2टीस्पून जिरेपावडर,कोथिंबीर बारीक चिरून,2टेबलस्पून तूप,आवश्यकतेनुसार पाणी,चवीप्रमाणे मीठ,थोडी साखर,
हे सर्व एकत्र करून 1/2 तास भिजवून ठेवावे.थालीपीठ थापून,तूप सोडून खरपूस भाजावे,दही आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
(यात दही,तूप आणि उकडलेला बटाटा आवश्यकच,त्यामुळेच ते आरवार आणि खुसखुशीत होते)


No comments:
Post a Comment