Tuesday, 7 March 2017

Cream of palak soup

Cream of palak soup

1/2 bunch of Palak duly washed and blanched.Strain water,keep aside.2 finely chopped medium size onions 2 teaspoons of refined floar(maida) soute in ghee or butter,grind to thin paste with blanched palak.Pour the mixture in a vessel,add 100 ml each of water and milk,add sugar and salt to taste and 1 teaspoon of black pepper powder.bring it to boil and serve with fresh cream or bread crumbs or roased papad or garlic bread.

Saturday, 4 March 2017

Watermelon punch

Watermelon punch

Cut watermelon and deseed,make small pieces,add lime juice,sugar,black salt,mint leaves,cummin powder,grated ginger and churn in the mixer with some ice cubes.Strain the juice and serve with crushed ice,garnish with mint leaves.

Thursday, 2 March 2017

बेळगावी कुंदा


बेळगावी कुंदा
1/2 लि म्हशीचे दूध तापत ठेवून त्यामध्ये थोडे आंबट दही घालून फाडावे.दुसऱ्या नॉनस्टिक पॅन मध्ये 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे डिंकपूड थोड्या साजूक तुपात परतून  फाडलेल्या दुधात घालावी.त्याच पॅन मध्ये  1 मोठी वाटी साखर पाणी न घालता लाईट ब्राऊन रंगावर कॅरामलाईज करून दुधात घालावी,
सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे, आवडत असल्यास वेलचीपूड घालावी,थंड झाल्यावर सर्व्ह करावे.(उपवासाला हवा असल्यास रवा न घालता कुंदा करावा)

Saturday, 25 February 2017

Upawasachi Idli Chatney


Mahashivratri special,an experiment which turned out fantastic and beyond expectations.
INSTANT UPWAS IDLI WITH GREEN CHATNEY.

Recipe
3 parts bhagar,1 part sago soaked for 2 hrs.Remove all water from it and grind to thick paste.Rest for another 2 hrs.Add  1 teaspon fruit salt with 1 teaspoon of lime juice and salt to taste.Mix well.Add the batter in preheated idli cooker,cook for 10 to 12 min.(Before adding the batter,greece idli plates with ghee.)
Remove nice and fluffy idlis,serve with green chatney.

Friday, 24 February 2017

उपवासाचे भाजणीचे थालीपीठ


पुन्हा एकदा उपवास स्पेशल भाजणीचे थालीपीठ.
भाजणी घरीच केलेली.साबुदाणा,वरई आणि राजगिरा सम प्रमाणात घेऊन भाजून घेतला,थंड  झाल्यावर ड्राय ग्राइंडरमध्ये दळून घेतली.
थालीपीठ रेसिपी
2 लहान वाट्या भाजणी,2 टेबलस्पून शेंगदाणाकूट,2 मध्यम आकाराचे उकडून किसलेले बटाटे,2 टेबलस्पून दही,2 मिरच्या बारीक चिरून,1/2 इंच आले किसून,1/2टीस्पून जिरेपावडर,कोथिंबीर बारीक चिरून,2टेबलस्पून तूप,आवश्यकतेनुसार पाणी,चवीप्रमाणे मीठ,थोडी साखर,
हे सर्व एकत्र करून 1/2 तास  भिजवून ठेवावे.थालीपीठ थापून,तूप सोडून खरपूस भाजावे,दही आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
(यात दही,तूप आणि उकडलेला बटाटा आवश्यकच,त्यामुळेच ते आरवार आणि खुसखुशीत होते)

Thursday, 23 February 2017

कवठाची जेली

महाशिवरात्र स्पेशल,कवठाची जेली

कवठ फोडून आतील गर काढावा,गर बुडेल इतके पाणी त्यामध्ये घालावे,1/2तासानी त्याचा सर्व गर काढावा,आणि तारेच्या चाळणीने गाळुन घ्यावा.जितका गर असेल तितकी किंवा थोडी कमी साखर त्यामध्ये घालुन उकळू द्यावे,मिश्रण सारखे ढवळत रहावे,थोड्या वेळाने ते घट्ट होऊ लागते,त्याचा फेस कमी होऊन चांगली चमक आली म्हणजे ते तयार झाले असे समजावे,डब्यात काढून थंड झाल्यावर वड्या पाडाव्या. तयार वड्या फ्रिजमधे बरेच दिवस राहू शकतात.कवठाच्या गरात नैसर्गिक पेक्टीन असते त्यामुळे जेली घट्ट होते व टिकते.

मिक्स व्हेज कोरमा

मिक्स व्हेज कोरमा

फ्लॉवर,मटार,बटाटा,गाजर,घेवडा सर्व मिळून 2 वाट्या मध्यम आकाराचे चिरून उकळून घ्यावे,पाणी काढून टाकावे.
1 मध्यम आकाराचा कांदा,1 टोमॅटो,आलंलसूण पेस्ट 1/2 टीस्पून,1/2 टीस्पून प्रत्येकी धने पावडर,जिरे पावडर,हळद,1 टीस्पून लाल तिखट,काजू तुकडा,1/2 टीस्पून खसखस,5/6 मिरे2/3 लवंग,2/3 हिरवी वेलची,लहान तुकडा दालचिनी आणि फुलचक्रीे हे सर्व बारीक वाटून घ्यावे.
2 टेबलस्पून तेल गरम करून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतावा,काजू असल्यामुळे कढईत खाली करपू देऊ नये,उकळलेल्या भाज्या घालाव्या,थोडे पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालावे,चिमूटभर साखर घालावी,मंद आचेवर तेल वर येईपर्यंत ठेवावे,कोथिंबीर घालून पराठा किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावा.