बेळगावी कुंदा
1/2 लि म्हशीचे दूध तापत ठेवून त्यामध्ये थोडे आंबट दही घालून फाडावे.दुसऱ्या नॉनस्टिक पॅन मध्ये 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे डिंकपूड थोड्या साजूक तुपात परतून फाडलेल्या दुधात घालावी.त्याच पॅन मध्ये 1 मोठी वाटी साखर पाणी न घालता लाईट ब्राऊन रंगावर कॅरामलाईज करून दुधात घालावी,
सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे, आवडत असल्यास वेलचीपूड घालावी,थंड झाल्यावर सर्व्ह करावे.(उपवासाला हवा असल्यास रवा न घालता कुंदा करावा)


No comments:
Post a Comment