Saturday, 18 March 2017

कोल्हापूरी बैंगनमसाला

कोल्हापूरी बैंगन मसाला
काट्याची लहान वांगी1/4 कि.चार चिरा पाडून पाण्यात टाका,2 मध्यम कांदे चिरून घ्या,5/6 लसूण पाकळ्या,1/2इंच आले,2 चमचे खोबरे,हे सर्व लाल रंगावर भाजून घ्या,आणि मिक्सरमध्ये 1/2 चमचा हळद,2 चमचे तिखट,1 चमचा धने पूड,1/2 चमचा जिरेपूड,1 चमचा गरम मसाला,3 चमचे कोल्हापूरी कांदालसूण चटणी,थोडा पुदिना आणि कोथिंबीर व 1 मोठा टोमॅटो घालुन बारीक वाटून घ्या.कढईत थोडे तेल गरम करून,वांगी फ्राय करून घ्या आणि बाजूला ठेवा,त्याच तेलामध्ये वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत थोडे थोडे पाणी टाकत परतून घ्या.चवीप्रमाणे मीठ घाला,फ्राय केलेली वांगी घाला,आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून,मध्यम आचेवर शिजवा,कोथिंबीर घालून भाकरीबरोबर सर्व्ह करा.बरोबर कांदा आणि मिरचीचा खर्डा असल्यास लै भारी कोल्हापूरी.

1 comment: