कोथिंबीर वडी
2 ते 2/5 वाट्या कोथिंबीर बारीक चिरलेली आणि कोरडी(यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या असतील तर स्वाद अधिक छान येतो) 1टीस्पून आलेलसूण पेस्ट,1 चमचा धने पावडर,1/2 चमचा जिरे पावडर,1/2 चमचा ओवा,1/4 चमचा हिंग,1 चमचा गरम मसाला,1/2 लिंबाचा रस,साखर 1 चमचा,1/4 चमचा खाण्याचा सोडा,मीठ चवीनुसार,2 चमचे तेल,2 टेबलस्पून डाळीचं पीठ,1/2 टेबलस्पून थालीपीठ भाजणी.हे सर्व हाताने एकत्र करून आवश्यकता असेल तरच अगदी थोडे पाणी घेऊन घट्ट गोळा मळावा, आणि लगेचच एका ट्रे ला तेल लावून थापून घ्यावा आणि 15 मिनिटे वाफवून घ्यावा. थंड झाल्यावर वड्या कापाव्या. या वड्या नुसत्यासुद्धा चांगल्या लागतात.त्या श्यालोफ्राय किंवा डिपफ्राय कराव्या.फार वेळ न तळता गोल्डन ब्राऊन झाल्यावर काढाव्या.खुसखुशीत होतात.हिरवी चटणी दही घालून त्याबरोबर द्यावी.


No comments:
Post a Comment