Thursday, 4 May 2017

मिक्स व्हेज कोरमा

मिक्स व्हेज कोरमा
फ्लॉवर,घेवडा,मटार,गाजर,बटाटा चिरून पाण्यामध्ये उकळून घ्यावे.काजू,खसखस भिजवून घेऊन त्यात ओले खोबरे,टोमॅटो,मिरची,आले,हळद,तिखट,गरममसाला घालून,थोडे पाणी घालून बारीक वाटावे.
कढईमध्ये थोडे लोणी आणि तेल घेऊन गरम झाल्यावर त्यात हिंग घालावा,वाटलेली ग्रेव्ही घालून तेल सुटेपर्यंत परतावे,चवीप्रमाणे मीठ घालावे,थोडे दूध घालून ग्रेव्ही उकळल्यावर त्यात भाज्या घालाव्या,आवडत असल्यास साखर घालवी,कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
(भाज्यांच्या प्रमाणात ग्रेव्हीचे पदार्थ घ्यावेत)
कांदा लसूण हवा असल्यास कांदा उकळून त्याचं पाणी काढून टाकावे आणि लसूण ठेचून घ्यावा आणि दोन्ही वाटून घेण्याच्या साहित्यात घालावे

No comments:

Post a Comment